मुबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हा तरुण धावत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. बांद्रा वरळी सी लिंकवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी धावत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
इमरान झहीर आलम अन्सारी आणि गुलफाम सबीर अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या दोन तरुणाची नावे आहेत. कारच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून मंगळवारी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संबंधित आरोपी सोमवारी रात्री बांद्रा ते वरळी दरम्यान असणाऱ्या सी लिंकवर गेले होते. याठिकाणी एक आरोपी कारच्या बोनेटवर बसला होता. तर अन्य आरोपी वेगाने कार चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी या सी लिंकवरून जाणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला.
https://twitter.com/Princy_Vishu/status/1488800701157634051
त्याने हा व्हिडिओ ट्वीट करून यामध्ये मुंबई पोलिसांना देखील टॅग केले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून इमरान आणि गुलफाम या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींवर कलम 279 आणि कलम 336 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.