विकृतीचा कळस ! ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याने केले ‘हे’ घाणेरडं कृत्य…

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटामुळे सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यामुळे बहुतेक ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू आहेत. या ऑनलाईन क्लास दरम्यान अनेक चित्र विचत्र घटना घडत आहेत. अशीच एक घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये राजस्थानच्या एका विद्यार्थ्याने सर्व मर्यादा ओलांडत एक धक्कादायक प्रकार केला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी नववीमध्ये शिकणाऱ्या या 15 वर्षीय विद्यार्थ्याला राजस्थानमध्ये जाऊन अटक केली आहे. या विद्यार्थ्याने ऑनलाईन क्लासदरम्यान आपला प्रायव्हेट पार्ट महिला शिक्षिकेला दाखवला होता.

हि घटना 15 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान ऑनलाईन क्लासमध्ये अनेकवेळा घडली आहे. यानंतर महिला शिक्षिकेने क्लास बंद करण्याचा विचार केला होता. यानंतर पीडित शिक्षिकेने मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात आरोपी विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर मुबई पोलिसांनी या आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलिसांची एक टीम मागील महिन्यात राजस्थानमध्ये गेली होती. यानंतर या टीमने आरोपी विद्यार्थ्याला जैसलमेरमधून अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याकडून एक लॅपटॉप जप्त केला आहे. या विद्यार्थ्याने आपल्या लॅपटॉपमध्ये गार्ड लावून ठेवले होते. ज्यामुळे कोणी त्याचा आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅक करू नये. या विद्यार्थ्याने अत्यंत हुशारीने हे कृत्य करत स्वतःचा चेहरादेखील लपवला होता. या पीडित शिक्षिकेने एकदा आरोपीच्या बँकग्राऊंडचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवला होता. यामुळे पोलिसांना तपासात मदत झाली. पोलिसांनी या आरोपी विद्यार्थ्याची चौकशी केली असता त्याने सांगितले कि त्याने मस्करी म्हणून ऑनलाईन क्लासदरम्यान आपला प्रायवेट पार्ट दाखवला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

You might also like