Tuesday, February 7, 2023

‘मुंबईकरांनो हिरोपंती बंद करा..’; मुंबई पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर कारवाई

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. त्यामुळॆ अनेक शहर कोरोनामुक्त होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. याचा फायदा घेऊन काही जण विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटनी आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोना महामारी अर्थात साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम १८८, ३४ IPC दिनांक २ जून २०२१ नुसार या गुन्ह्याची नोंद केली आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी हे बांद्रा येथे आपले जिम पूर्ण केल्यानंतर ड्राईव्हसाठी गेले होते. त्याचवेळी बांद्रा येथील बँडस्टँड पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचे आधार कार्ड, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर त्या दोघांसह ड्रायवर असे त्या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी या दोघांना लॉकडाऊन असतानाही फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे.

एकीकडे संपूर्ण राज्यभरात कोरोना विषाणूच्या महामारीने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. संपूर्ण प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या महामारीसोबत लढत आहे. अश्यावेळी अनेकजण त्यांच्या मदतीसाठी उभे राहत आहेत. यात अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे. मात्र टायगर आणि दिशा यांच्यासारख्या सेलेब्रिटी चेहऱ्यांमुळे अन्य यंत्रणेचा भार वाढू शकतो. कारण बहुतेकदा लोक आपल्या आवडत्या कलाकाराच्या पावलावर पाऊल ठेवणे पसंत करतात. यामुळे पोलिसांनी केलेली हि कारवाई अगदीच योग्य असून योग्य वेळी अश्या चुकीच्या वर्तनास चाप बसविणे गरजेचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले.