नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या (murder) करण्यात आली आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या (murder) करण्यात आली आहे. त्याची हत्या (murder) केल्यानंतर त्याचा मृतदेह कापसी तलावात फेकून देण्यात आला होता. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अजून समजू शकलेले नाही पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
27 ऑगस्ट रोजी पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापसी तलावात एका अनोळखी युवकाचा मृतदेह (murder) आढळून आला होता. मात्र, हा मृतदेह दोन दिवसांपासून पाण्यात असल्याने त्याची ओळख पटू शकली नव्हती. यानंतर हा मृतदेह (murder) वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचे समोर आले. अखेर ओळख न पटल्यामुळे पोलिसांनी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

29 ऑगस्ट रोजी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी अर्धा किलोमीटर अंतरावर एका रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली. या व्यक्तीचे नाव भागवत अजाबराव देशमुख असल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा (murder) गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर