व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बनावट पेसमेकर बसवून 200 रुग्णांचे जीव घेणारा नराधम डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात   

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डॉक्टरांना आपण ईश्वर मानतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो. परंतु उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात धक्कादायक आणि डॉक्टरी  पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या डॉक्टरचं नाव समीर सर्राफ असून हा डॉक्टर हृदयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णांच्या छातीत बनावट क्वालिटीचं पेसमेकर लावायचा. सदर डॉक्टरच्या कृत्यामागे पैसा कमावणे हाच त्याचा हेतू होता. पैशाच्या मोहापायी समीर सर्राफने जवळपास 200 जणांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या नराधम ‘मिस्टर डॉक्टर डेथ’ला पोलिसांनी अटक केली आहे.

 

हाती आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील एका डॉक्टरने उपचारात हलगर्जीपणा करुन सुमारे 200 जणांचा जीव घेतला आहे. पेसमेकर हे मशीन आहे, जे प्रत्यार्पण करुन हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी छातीच्या आतल्या भागात बसवलं जातं. पण डॉक्टरने बनावट व हलक्या क्वाॅलिटीचे पेसमेकर रुग्णांच्या हृदयाजवळ बसवले. त्यातून अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इटावा येथील 46 वर्षीय नूरबानो यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना इटावाच्या सरकारी रुग्णालयात नेलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्यांना पेसमेकर बसवण्याचा सल्ला दिला. पण डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यानंतर हे पेसमेकर छातीच्या आत बसवलं नाही तर बाहेरच्या बाजूने बसवल्याची माहिती समोर आली. नूरबानो यांनी जवळपास अडीच महिने जीवनाशी संघर्ष केला. त्यानंतर नूरबानो यांचा मृत्यू झाला.

 

इटावाच्या 40 वर्षीय रहिवासी नजीमा यांनादेखील हृदयाशी संबंधित आजार झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यांच्या उपचारासाठी जवळपास 4 लाख खर्च केले. त्यांनादेखील पेसमेकर लावण्यात आलं. पण त्यांचादेखील मृत्यू झाला. अशाप्रकारच्या अनेक घटना इटावामध्ये घडल्या आहेत. या घटनांमागील खरा सूत्रधार आता समोर आला आहे. या नराधम डॉक्टरने पैशांच्या मोहापायी रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. अशाप्रकारचे उपचार 600 पेक्षा जास्त रुग्णांवर करण्यात आले आहेत. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर अनेक रुग्णांचे नातेवाईक पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करत आहेत. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, ते समोर येत आहे.

 

नराधम डॉक्टरला अटक

या प्रकरणी अनेक तक्रारी 2017 पासून येत होत्या. पण या तक्रारीं तशाच दडपल्या गेल्या. पण या वर्षी या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. कारण युनिव्हर्सिटीचे चीफ मेडिकल सुपरिंटेंडेंट डॉक्टर आदेश कुमारने डॉक्टर समीर सर्राफ विरोधात मेडिकलच्या साहित्यांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डॉक्टर सर्राफच्या कारनाम्यांची चौकशी सुरु झाली. अखेर पोलिसांनी 7 नोव्हेंबरला या नराधम डॉक्टरला बेड्या ठोकल्या. ज्या उपचारासाठी रुग्णांना 75 हजार ते 1 लाखाचा खर्च यायचा, तिथे डॉक्टर सर्राफ हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून 4 ते 5 लाख रुपये वसूल करायचा.