महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही – प्रवीण दरेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर भाजप नेत्यांकडून सातत्याने हे सरकार लवकरच पडणार असे दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता भर पडली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही आता महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही असा दावा केला आहे. सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळल्याचा संदर्भ देत त्यांनी हे विधान केलं.

प्रवीण दरेकर म्हणाले, सह्याद्रीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळतो आणि सरकारला माहीतही पडत नाही. तसंच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही असे दरेकरांनी म्हंटल. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असं दरेकर म्हणाले.

दरम्यान, राज्यातील अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असं सांगतानाच मंदिर उघडण्याबाबतची सरकारची भूमिका विरोधी आहे. मंदिर उघडण्यासाठी सरकारचं मनोधैर्य का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment