#MyntraLogo | म्हणुन मिंत्राने घेतला वादग्रस्त लोगो बदलण्याचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | एखाद्या व्यवसायिक कंपनीसाठी तिचा लोगो आणि ब्रँड या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. लोगो हा कंपनी आणि प्रस्तावित गिऱ्हाईक यांच्यामध्ये दुवा साधतो. कंपनीचा लोगो खूप विचार करून आणि कंपनीचा भविष्यातील गोष्टी ठरवून बनवला जातो. असाच एक लोगो जो खूप दिवसापासून वादग्रस्त होता. तो आता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मिंत्रा या ई -कॉमर्स वेबसाईटचा लोगो आता बदलणार आहे.

नाझ पटेल या महिलेने डिसेंबर 2020 मध्ये या लोगो विरोधात मुंबई सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. सदरचा लोगो हा ‘महिलांचा अनादर करणारा आणि आक्षेपार्ह’ असल्याची मुंबई सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी मिंत्राकडे लोगो बदलण्याची मागणी केली होती. यानंतर मिंत्राने ते मान्य केले असून लोगो लवकरात लवकर बदलला जाईल असे कळवले आहे.

मित्रा ही भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स विक्रेत्या साईट पैकी एक आहे. मिंत्राणे वर्षाच्या शेवटी ‘सेंड ऑफ रिजन सेल’च्या नावाखाली 5 दिवसांमध्ये 1.1 कोटी प्रोडक्टस विकले. वार्षिक थंडीच्या सेल मध्येही मित्रांकडे 50 टक्के पेक्षा जास्त वेबसाईटचे ट्राफिक खेचले गेले असते. यामुळे मींत्रा ही एक महत्वाची ई-कॉमर्स कंपनी आहे. आणि महिलांचा आदर ठेवण्यासाठी मिंत्रा आपला लोगो लवकरच बदलणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment