हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यात मुलांच्या व त्यांच्या आईच्या खुन झाल्याची घटना घडली होती. या खूनाचा तपास गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून सुरू होता. अखेर या खुनाचे माय- लेकराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पत्नी आलीया व सहा वर्षाचा मुलगा याचा पती आबिद अब्दुल शेख यानेच खून केला असून त्याने स्वतःही आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेचा उलघडा शुक्रवारी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासाची सूत्रे अधिक वेगाने हलवली. त्यावेळी त्यांना आबिद अब्दुल शेख याचा मृतदेह सिंहगड परिसरातील खानापूर येथील नदीपात्रात आढळून आला. यावेळी त्याच्याजवळ एक बॅग मिळून आली. त्यामध्ये आबिद याच्या अंगावर रक्ताने माखलेले कपडे होते. कौटुंबिक कलह आणि मुलगा ऑटिझमग्रस्त असल्यामुळे कुटूंब तणावात होते. त्यातुन त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासातून मिळालेली आहे.
धानोरी येथील राहणाऱ्या पत्नी अलिया अबिद शेख हीचा सासवड रस्त्यावर मंगळवारी पहाटे मृतदेह आढळला होता. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी तिच्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर सापडला होता. तपासात दोघांचे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेची सहा पथके काम करत होती.
दरम्यान, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खानापूर गावच्या हद्दीत मासेमारी करणारा एका तरूणाला शुक्रवारी सकाळी सात वाजता पाण्यावर तरंगताना एक मृतदेह दिसला. त्यांनी त्वरीत पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीणच्या उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्यानंतर नावाडी सुरेश धुमाळ यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाजवळ एक बॅग मिळून आली. त्यामध्ये आबिद याच्या अंगावर रक्ताने माखलेले कपडे होते. कौटुंबिक कलह आणि मुलगा ऑटिझमग्रस्त असल्यामुळे कुटूंब तणावात होते. त्यातुन त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासातून मिळालेली आहे.