Monday, February 6, 2023

कांद्याचे वाढते दर नियंत्रित करण्यासाठी NAFED ने उचलले ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने आपल्या प्रयत्नांना वेग दिला आहे. नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाने (NAFED) शुक्रवारी सांगितले की, त्यांनी 15 हजार टन आयातित कांद्याचा पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत आणि निविदांना याबाबत अंतिम निर्णय देण्यात आला आहे. यामुळे स्थानिक बाजारात उपलब्धता वाढेल आणि किंमती नियंत्रणात राहतील, असे नाफेडने म्हटले आहे.

नियमित निविदा देण्याची योजना
नाफेड पुढे म्हणाले की, आयातित कांदा बंदर शहरांतून वितरीत केले जातील, त्यामुळे जलद पुरवठा व्हावा, यासाठी राज्य सरकारांना त्यांना किती प्रमाणात कांद्याची गरज आहे, असे विचारले गेले आहे. आयात केलेल्या कांद्याच्या अतिरिक्त पुरवठ्यासाठी नाफेडची नियमित निविदा काढण्याची योजना आहे.

- Advertisement -

एका अधिकृत निवेदनानुसार, “काल (गुरुवारी) तुतीकोरिन आणि मुंबईत पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या निविदांना नाफेडला चांगला प्रतिसाद मिळाला. काल संध्याकाळी नाफेडने यशस्वी बिडर्सना अंतिम रूप दिले, जेणेकरुन बाजारपेठेत वेळेवर पुरवठा करता येईल.

कांद्याची गुणवत्ता व आकार यावर भर
नाफेड म्हणाले की, यावेळी त्यांनी कांद्याच्या गुणवत्तेवर आणि आकारावर विशेष भर दिला आहे, जो भारतीय ग्राहकांच्या निवडीशी जुळत आहे. विशेष म्हणजे भारतात मध्यम आकारातील कांद्याला साधारणपणे पसंती दिली जाते, तर परदेशी कांद्याचे आकार हे 80 मिमी पर्यंत असतात.

गेल्या वर्षी एमएमटीसीने थेट तुर्की आणि इजिप्तमधून पिवळे, गुलाबी आणि लाल कांदे आयात केले होते, तर यंदा कमीतकमी चांगल्या प्रतीच्या कांद्याचा पुरवठा व्हावा यासाठी खासगी आयातदारांना पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे. नाफेड म्हणाले की, दरम्यान कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ किंमतींमध्ये निरंतर घट दिसून आली आहे.

रब्बीचा जुना साठा (हिवाळा) आणि खरीप (उन्हाळा) यांचा महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व इतर राज्यांतील नवा साठा असल्याने कांद्याचे दर नियंत्रणात राहिले.

अपेक्षित पुरवठ्यात तेजी
नाफेडने अशी आशा व्यक्त केली की सरकार आणि बफर, आयाती आणि नवीन आगमनाच्या धोरणात्मक हस्तक्षेपामुळे पुरवठा वेगवान होईल आणि कांद्याचा बाजार लवकरच सामान्य होईल. बाजारभावानुसार देशातील काही भागातील कांद्याचे किरकोळ दर प्रति किलो 80-100 रुपयांपर्यंत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.