व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नागपूर हादरलं ! पत्नीसह मुलीची गळा चिरुन हत्या नंतर पतीची देखील आत्महत्या

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली आहे. यानंतर या आरोपीने पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, नागपुरातील राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव विलास गवते असे आहे. विलास गवते याने घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून विलास गवते या व्यक्तीने हे कृत्य केले असल्याचे समजत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल ‘परम का ढाबा’ या हॉटेलच्या संचालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सोनी भुपेंद्र राजपूत असे आत्महत्या करणाऱ्या संचालकाचे नाव आहे. त्यांनी कामठी रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. मात्र त्यांनी नेमकी कोणत्यामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.