हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur To Pune Train। नागपूर आणि पुणेकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर मधून पुण्याला कामानिमित्त येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. लांब पल्ल्याचा रस्ता असल्याने आणि नागपूर- पुणे रेल्वेची संख्याही मर्यादित असल्याने यावर उपाय म्हणून नागपूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे नागपूर विभागाने पाठवला आहे. मात्र त्याच्या आधीच नागपूर आणि पुण्याला जोडणारी एक नवीन सुपरफास्ट ट्रेन मिळाली आहे. या ट्रेनमुळे नागपूर ते पुणे अंतर कमी वेळात पार करता येणार आहे. या नव्या रेल्वेगाडीचे नाव काय आहे? आणि तिचं वेळापत्रक कस राहील याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतीय रेल्वेने मध्य प्रदेशातील रेवा ते महाराष्ट्रातील पुणे या नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनला (Nagpur To Pune Train) हिरवा कंदील दिला आहे. विदर्भ आणि मध्य आणि पश्चिम भारतातील प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होईल.. या रेल्वेगाडीचा क्रमांक ट्रेन क्रमांक २०१५२/२०१५१ असा आहे. साप्ताहिक ट्रेन असल्याने ती आठवड्यातून एकदाच धावेल. हि रेल्वे रीवा येथून निघून सतना, कटनी, जबलपूर, नैनपूर, बालाघाट, गोंदिया आणि नागपूरमार्गे पुण्याला पोहचणार आहे. यामुळे नागपूर आणि पुणे एकमेकांना कनेक्ट होणार आहे.
कस आहे टाईमिंग – Nagpur To Pune Train
ही साप्ताहिक ट्रेन 20 डब्यांची असेल. महत्त्वाच्या प्रत्येक स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे. हि नवीन सुपरफास्ट रेल्वे दर बुधवारी सकाळी ६:४५ वाजता रेवा मधून सुटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ६:२० वाजता ती नागपूरला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी ९:४५ वाजता पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक २०१५१ दर गुरुवारी दुपारी ३:१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि शुक्रवारी पहाटे ५:२५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि शेवटी त्याच दिवशी संध्याकाळी ५:३० वाजता रेवा येथे थांबेल.
कोणकोणत्या स्थानकांवर ट्रेन थांबेल?-
नव्या ट्रेनला वर्धा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड येथे थांबे असतील. हा रूट पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी एक महत्त्वाचा प्रवास मार्ग ठरतोय. नागपूर आणि पुण्याला जोडणाऱ्या या ट्रेन मध्ये चार सामान्य, सहा स्लीपर, तीन एसी थर्ड टियर, तीन थर्ड एसी इकॉनॉमी आणि दोन सेकंड एसी डबे असतील. सर्व प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत आरामदायी प्रवास करता यावा हाच यामागचा उद्देश आहे.
सध्या पुणे- नागपूर रेल्वेरुळावरून (Nagpur To Pune Train) गरीब रथ, हमसफर आणि अजनी-पुणे एसी स्पेशल असे अनेक रेल्वेगाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत, मात्र तरीही या गाड्यांना वेटिंगचा सामना करावा लागतो. खास करून विकेंडला आणि सणासुदीच्या काळात पुणे- नागपूर रेल्वेला मोठी गर्दी पहायला मिळते.