व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या नमरा कादिरने ब्लँकमेलिंगबाबत केले अनेक मोठे खुलासे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये फसवणाऱ्या युट्यूबर नमरा कादिरला (namra qadir) पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी 80 लाख रुपये जप्त केले आहेत. तर पती विराट बेनिवाल याच्या अटकेसाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणी त्या व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी नमराला (namra qadir) अटक केली. यानंतर नमराने ब्लँकमेलिंगबाबत अनेक मोठे खुलासे केले. तिने व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात कसे अडकवले ते जाणून घेऊया…..

नमराचे (namra qadir) सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग जास्त आहे. 2 लाखांपेक्षा जास्त युजर्स तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. नमरा तिचे ग्लॅमर्स फोटो नेहमी सोशलवर अपलोड करत असते. यावेळी अचानक 24 नोव्हेंबर रोजी गुरुग्राम येथील पोलीस चौकीत तिच्या विरोधात एका व्यवसायिकाने तक्रार दाखल केली.

काय सांगितले तक्रारीमध्ये?
नामराने (namra qadir) माझ्याकडून तब्बल 80 लाख रुपये घेतले. यात तिचा पती विराट बेनीवालचाही समावेश आहे, दोघांनी मला धमकी दिली कि तू पैसे दिले नाही तर तुला आम्ही रेप केस मध्ये फसवू .. व्यवसायिकाने पोलिसांना पुढे सांगितले,’ मी काम निमित्त नामरा कादिरला रेडिसन होटल सोहना रोड येथे भेटलो होतो. ती यू ट्यूबर आहे . तिचे विडिओ मी यापूर्वी पहिले होते. तिनेच मला विराट बैनीवाल सोबत ओळख करून दिली जो एक YouTuber देखील आहे आणि नामराचा मित्र आहे. त्यांनी मला माझ्या फर्ममध्ये काम करण्यासाठी होकार दिला. दोन लाख आगाऊ रक्कम मागितली.’ तो म्हणाला, “मी त्याला त्याच दिवशी दोन लाख रुपये दिले कारण, मी नम्राला काही काळापासून ओळखत होतो. नंतर, जेव्हा मी त्याच्याकडे जाहिरातीचे काम आणले आणि त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्याने हो म्हटले आणि आणखी 50,000 रुपये मागितले, जे मी त्याला त्याच्या खात्यात दिले. त्यानंतर त्याने माझे काम केले नाही.

यानंतर नामरा मला म्हणाली कि काम फक्त एक निमित्त आहे. तिला मी आवडतो आणि तिला माझ्याशी लग्न करायचे आहे. बहिणीच्या लग्नानंतर ती मला माझे पैसे परत करेल. यानंतर मला पण ती आवडली आणि आम्ही एकत्र हँग आउट करू लागलो. विराट नेहमीच तिच्यासोबत होता. एके दिवशी आम्ही क्लबमध्ये पार्टी करायला गेलो असताना नामरा (namra qadir) आणि विराटने मला जबरदस्ती दारू पाजली. आम्ही तिघांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि झोपलो. सकाळी उठल्यावर नम्राने माझ्याकडे माझे कार्ड मागितले. तेव्हा मी तिला कार्ड देण्यास नकार दिला. यानंतर तिने बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, असे सांगितले. मी घाबरलो आणि तिला विनंती केली की आपण मित्र आहोत आणि मी काही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे तिने हे करू नये. त्यानंतर विराट बनीवालने आपली खरी ओळख सांगितली. तो तिचा नवरा आहे आणि तिला चांगला ओळखतो. मी त्याचे ऐकले नाही तर तो मला अडकवेल. या घटनेनंतर मी त्यांचे म्हणणे ऐकले आणि आत्तापर्यंत त्यांनी एकूण 70-80 लाख रुपयांचा माल आणि रोख रक्कम घेतली असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.’ असे त्या व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

नमराचा पती अद्याप फरार
दुसरीकडे, व्यावसायिकाच्या तक्रारीवरून 24 नोव्हेंबर रोजी सेक्टर 50 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर “नमरा कादीर” (namra qadir) आणि तिचा पती मनीष उर्फ ​​वरुण बेनिवाल यांना शोधण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरु केली. गुडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नम्रा कादिरला दिल्ली परिसरातून अटक केली तर मनीष उर्फ ​​वरुण बेनिवाल हा अद्याप फरार आहे. नमराला 4 दिवसांच्या कोठडीत घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट