तनुश्री दत्ता ने केलेल्या आरोपांना नाना पाटेकर जाहीर उत्तर देणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत नानांनी माझ्यासोबत असभ्य वर्तन केले होते असे म्हटले होते. यावर आता नाना पाटेकर यांनी जाहीर उत्तर देण्याचे ठरवले आहे. नाना यासंदर्भात लवकर पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजत आहे.

नाना पाटेकर सध्या राजस्थान मधील जैसलमर येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. दरम्यान राजस्थानातून मुंबईला परतल्यावर पत्रकार परिषद घेऊन तनुश्री ने केलेल्या आरोपांना उत्तरं देणार आहे असं पाटेकर यांनी सांगीतले आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’च्या शूटींगवेळी नानाने आपल्याशी गैरवर्तन केले होते. मनसेकडून मला धमकावले होते, असे खळबळजनक आरोप तनुश्रीने केले आहेत. तनुश्रीच्या आरोपांवरून बॉलिवूडमध्ये उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. तसेच बॉलिवूड मधे या विषयावर दोन गट पडले असून काही तनुश्रीचे आरोप खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत आहेत. तर काहिजण तनुश्रीची बाजू घेणारे आहेत.

Leave a Comment