नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाना पटोले मिरकवाडा बंदरावर दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे तीन दिवस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केलों. त्याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या भागाला भेट देत पाहणी केली. त्यांच्यानंतर आता कॉंग्रेसच्या नेत्यांकडून नुकसानीची पाहणी केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी मिरकवाडा बंदरावर दाखल झाले आहेत.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या नुकसानीवरून आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप व प्रत्यारोप केले जात आहे. अशात आता काँग्रेसकडूनही येथील नुकसानीचा आढावा घेन्यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी जाऊन मच्छीमारांची व विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व समस्या ऐकून घेतली.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा करण्यापूर्वी नाना पटोले यांनी काळ रायगड जिल्ह्याचा दौरा केला आहे. यावेळी तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत मच्छिमारांशीही त्यांनी संवाद साधला आहे. येथील नुकसानीबाबत आढावा घेत त्याचा अहवाल तत्काळ राज्य शासनाकडे पाठवून शासनाकडून नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पटोले यांनी काल सांगितले.

Leave a Comment