सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात लावला तर…; नाना पटोलेंचा ED ला थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ईडीला इशारा दिला आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात जरी लावला तर देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व तुरुंग भरवून दाखवू, असा थेट इशारा पटोले यांनी ईडीला दिला आहे.

भंडाऱ्यातील एका जाहीर सभेस नाना पटोले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ईडी व केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देशभर नवसंकल्पाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार देशात 1 आणि 2 तारखेला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान आता तपास यंत्रणांनी 2015 मध्ये हे प्रकरण बंद केलेले नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा उतरून काढले आहे. आता याच पार्श्वभूमीवर गांधी परिवाराला लक्ष्य केले जात आहे.

आमच्या नेत्यांना हात लावून दाखवा, जितके तुरुंग भरायचे आहेत, तितके देशातील, महाराष्ट्रातील तुरुंग भरवून दाखवू याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल,” असा इशारा नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकार व ईडीला दिला आहे. काँग्रेस नेत्यांच्या इशाऱ्यानंतर आता ईडी व केंद्र सरकारकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment