नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; किमान समान कार्यक्रमाची करून दिली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकार वर काँग्रेसचे 25 आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे.

या पत्रात सीएमपीद्वारे दलित मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात मागील 3 वर्षात सीपीएमपी शक्य झाले नाही. परंतु, आता कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे सीएमपी पुन्हा राबवावी, दलित आणि मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी योजना राबवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती नाना पटोले यांनी केली.

”काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेलं आहे. मागील दोन वर्षांत करोनामुळं राज्य सरकारपुढं अनेक समस्यांचा डोंगर उभा होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढं किमान समान कार्यक्रम राबविला जाईल,” असं पटोले म्हणाले.