ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्र; नाना पटोलेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्र आहे. मोदी शहा यांच्या केंद्रातील सरकार मुळे ईडी सुद्धा गुलाम बनली आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकार वर सडकून टीका केली.

नाना पटोले म्हणाले, ईडी म्हणजे केंद्र सरकारच कुत्र आहे, कोणाला चावायचं, कोणाला नाही हे त्याला सांगितलं असतंय. इडी ही काय आता स्वतंत्र व्यवस्था राहिली नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं बाहुल बनलेली तपास यंत्रणा म्हणजे ईडी आहे अशी बोचरी टीका नाना पाटोले यांनी केली. मोदी आणि अमित शहांना पदावरून खाली केल्यानंतरच ईडी पण स्वतंत्र होईल. केंद्रातील या सरकारमुळे ईडी सुद्धा गुलामीमध्ये आली आहे असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी मुळे काँग्रेस आक्रमक झाली असून देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कडून भाजपविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. महाराष्ट्रतही अनेक ठिकाणी केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यातच आता नाना पटोले यांच्या या टीकेला भाजपकडून काय उत्तर येणार हे आता पाहावं लागेल.