माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार – नारायण राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. दरम्यान नारायण राणे यांची देखील सुरक्षा कपात करण्यात आली असून सरकारच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल,अस खासदार नारायण राणे यांनी दिलीय

राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकताने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल”, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच- सत्तार

दरम्यान, राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment