नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्ही लस घेऊ ; ‘या’ नेत्याचं धक्कादायक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात दुसऱ्यांदा 700 जिल्ह्यांमध्ये कोरोना लशीचं ड्राय रन सुरू आहे. 13 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता असतानाच बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि RJD नेते लालू यादव यांचे मोठे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्हाला ही लस घेऊ असं विधान त्यांनी केलं आहे. याआधी देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोरोना लस मिळण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.

RJD नेता माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोरोना लसीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये सांगितले की, मी कोरोना लस घेणार नाही कारण कारण मला भाजपवर विश्वास नाही. टाळ्या आणि थाऴी वाजवणारं सरकार लसीकरणासाठी एवढी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळी वाजवून कोरोनाला पळवून लावा असा आरोप अखिलेश यादव यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, साधारण 13 जानेवारीपासून देशभरात कोव्हिड 19 च्या लसीकरणास सुरुवात होऊ शकते. या लसीकरणाबाबत सर्व माहिती CoWIN अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येईल, या अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सिनसाठी आपण फ्री रजिस्ट्रेशन करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment