विदर्भात निवडणुकांचं रान तापवण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज; अकोल्यात आज भव्य सभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 अकोला प्रतिनिधी । राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांचा प्रचार शिगेला पोहचला असून त्या साठी राज्यभर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ९ सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याच अनुषंगाने पश्चिम विदर्भातील भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोल्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

येत्या गुरुवारी १६ तारखेला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात मोदींची जाहीर सभा होणार असून सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा धोत्रेंनी केला. या सभेसाठी तगडा बंदोबस्त तसेच पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आदी सभेच्या व्यवस्थेत बाबाबत त्यांनी माहिती दिली.

Leave a Comment