Gujarat Election 2022 : पंतप्रधान मोदींनी रांगेतून जात बजावला मतदानाचा हक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 93 जागांसाठी हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील निशान पब्लिक स्कूल, राणीप येथे मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानास नुकतीच सुरुवात झाली. यावेळी मतदान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठीक 9 वाजता मतदान केंद्र परिसरात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी गाडीतून उतरत पायी चालत मतदान केंद्र गाठले. ठीक 9 वाजून 30 मिनिटांनी मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मोदींनी रांगेत उभे राहून आपले मतदान केले. मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांना भेटण्यासाठी पायी चालत त्यांच्या घरी गेले.

सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी मतदान केल्यानांतर गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेतेही मतदान करणार आहेत.