चाळीस दिवसात 40 आमदार गेले हा तर हनुमान चालीसेचाच प्रभाव…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. हा सर्व प्रभाव हा हनुमान चालीसेचा असल्याचा टोला मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी लगावला आहे.

मिश्रा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र अडीच असलेले ज्यांचे महाविकास आघाडीचे सरकार पडते, ज्यांच्या पक्षात फुट पडते, त्यांच्याशी नेतृत्व करणाऱ्यांना विचारायला हवे की सरकार कसे पडले. कमलनाथ यांना विचारा त्यांचे 32 आमदार कसे गेले. उद्धव ठाकरेंना विचारा. हा हनुमान चालीसाचा प्रभाव आहे. चाळीस दिवसांत चाळीस आमदार निघून गेले.

संजय राऊत म्हणत होते आमच्या लोकांचं अपहरण केलं होतं असं ते म्हणत होते. ते भगवे झाले. देशात पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकार पडलंय. माझा देश बदलतोय,” असेही मिश्रा यांनी यावेळी सागितले.

Leave a Comment