नासाच्या कोणत्याही पॅनलवर दिक्षाची निवड झालेली नसल्याचा नासाचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मागील आठवड्यात इयत्ता दहावीत शिकत असलेली औरंगाबादचे दीक्षा शिंदे हिची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याची माहिती उघडकीस आली होती. परंतु दिक्षा नासाच्या कोणत्याही पॅनलवर नसून तिला कोणतीही फेलोशिप मिळत नसल्याचे स्पष्टीकरण नासा कडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर दिक्षाने संशोधन पेपर स्वीकारण्याचा दावा केला होता, हा दावाही नासाने फेटाळून लावला आहे.

वुई लिव्ह इन ब्लॅकहोल? हा एक संशोधन पेपर मी 2019 मध्ये सादर केला होता. या माध्यमातून अल्पसंख्याक सेवा संस्था (एमएसआय) फेलोशिपच्या व्हर्चूअल पॅनलिस्ट द्वारे आपली नासाने नियुक्ती केल्याचा दावा रिक्षाने केला होता. यासाठी नासाकडून मानधन मिळते असेही तिने म्हटले होते. नासाकडून भारतीय मुलीची निवड झाल्याची माहिती कळतात याबाबत विचारपूस करण्यासाठी ए एन आय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधला असता या ई-मेलला नासाच्या केटरिंग ब्राऊन यांनी उत्तर दिले असून यामध्ये दीक्षा शिंदे नासाच्या कोणत्याही पदावर नियुक्त नसून तिला कोणतेही मानधन देण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पॅनलिस्टची निवड करण्याची प्रक्रिया ही थर्ड पार्टीकडून केली जाते. दीक्षा बद्दल चुकीच्या माहितीच्या आधारे विनंती करण्यात आलेली होती. या फेलोशिपसाठी फक्त अमेरिकेचे नागरिक पात्र असून नासाकडून दीक्षाचा एकही संशोधन पेपर स्वीकारण्यात आलेला नाही. त्याचबरोबर दिक्षाचा अमेरिका दौऱ्याचा खर्चही नासा करणार नसल्याचा दावा खोटा असल्याचे कॅतरीन ब्राऊन यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास नासाचे महानिरीक्षक कार्यालय करणार आहेत.

“माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असून मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. गुणवत्तेच्या आधारावरच नासाने फेलोशिप पॅनलवर माझी निवड केली होती. याप्रकरणी मला नासाच्या अधिकृत वेबसाईटवरुन विचारणा करण्यात आली होती. नासा सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे मी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला होता. दोन वेळा मी माझे लेख पाठवले होते. नंतर यामध्ये सुधारणा करून मी परत लेख पाठवला. तिसऱ्यांदा त्यांनी हा संशोधनपर लेख स्वीकारला.” – दीक्षा शिंदे

Leave a Comment