NASA चा इशारा – पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतो आहे London Eyeपेक्षा उल्कापिंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग अजूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराशी झगडत आहे, अशा परिस्थितीत सर्व नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीवर संकट बनून अवतरत आहेत. कधी पूर, कधी भूकंप तर कधी जोरदार पाऊस यावर्षी मानवांचा विनाश करीत आहेत. आता अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. लंडन आयपेक्षा एक मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे असा इशारा नासाने जारी केला आहे. ज्यामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. या वर्षी पृथ्वीच्या दिशेने येणारी ही काही पहिली उल्का नाही.

यापूर्वी जूनमध्येसुद्धा एक उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेला. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसले तरी आता नासाने (नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) असाच आणखी एक इशारा दिला आहे. असे सांगितले जात आहे की, आउटर स्पेस मध्येही अनेक विचित्र घटना घडत आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांव्यतिरिक्त अंतराळातील विचित्र परिस्थितीबद्दल माहिती प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे यावर्षी सहा ग्रहण लागणार असून त्यापैकी तीन ग्रहण हे गेल्या एकाच महिन्यात झाली असून यावर्षी 10 जानेवारी रोजी एक ग्रहण झाले होते. एकाच वर्षात अनेक ग्रहण आणि महिन्यात तीन ग्रहण होणे हे पृथ्वीसाठीसुद्धा चांगले मानले जात नाही.

नासाने एका धोकादायक आणि प्रचंड उल्कापाताविषयी जगाला चेतावणी दिली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, एक प्रचंड उल्का वेगाने पृथ्वीकडे येत आहे. ही उल्का जगप्रसिद्ध लंडन आयपेक्षाही मोठी आहे. इंग्लंडचे लँडमार्क लंडन आय लांबी 443 फूट आहे आणि ही उल्का त्यापेक्षा 50 टक्के जास्त मोठी आहे. ही उल्का येत्या काही दिवसांत पृथ्वी जवळून जाईल. अमेरिकन अंतराळ तज्ञानी अंतराळातून येणाऱ्या या उल्कापिंडाचे नाव ‘उल्कापिंड 2020 ND’ असे ठेवलेले आहे. ज्याचे एक संभाव्य धोका म्हणून वर्णन केले गेले आहे. असे म्हटले जात आहे की, 24 जुलै रोजी एक मोठा 170 मीटर उंच दगड आपल्या पृथ्वीकडे 0.034 AU (Astronomical unit)च्या रेंज मध्ये पोहोचेल.

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की ही वेगाने येणारी उल्का एक एयू (149,599,000 किमी) आहे. जे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर आहे. मात्र , असा मानले जाते आहे की शनिवारपर्यंत, हा प्रचंड उल्कापिंड 13.5 किलोमीटर प्रति सेकंड किंवा ताशी 48,000 किलोमीटरच्या वेगाने येईल आणि ती आपल्या पृथ्वीपासून 5,086,328 किलोमीटर असेल. शास्त्रज्ञ याबाबत म्हणतात की, असे उल्कापिंड बहुतेक वेळा पृथ्वीजवळून जातात. काही उल्कापिंडांचे आकार लहान असतात तर काही उल्कापिंडांचे आकार हे मोठे असतात.

परंतु अशा मोठ्या उल्का नेहमीच येत नाहीत. अशा उल्कापिंड त्यांचा मार्ग बदलण्याची शक्यता खूपच कमी असतो. परंतु जर त्याने थोडासा जरी मार्ग बदलला किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने त्याला आकर्षित केले तर ते जगासाठी एक मोठे धोका ठरू शकते. हेच कारण आहे कि नासाने लंडन आयपेक्षा 50 टक्के मोठ्या असलेल्या या उल्कापिंडाविषयी चेतावणी जारी केली आहे. मात्र , या घटनेवर सध्या जगभरातील अनेक वैज्ञानिक लक्ष ठेवून आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment