स्टंट करण्याच्या नादात गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला तरुण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मालेगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्हातील मालेगावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पुराच्या पाण्यात उडी मारून स्टंटबाजी (Stunt) करणारा तरूण वाहून गेला आहे. या ठिकाणी गिरणा नदीला पूर आल्याने पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. याचदरम्यान एक तरूण स्टंटबाजी (Stunt) करण्यासाठी नदीच्या पुलावर चढला आणि चक्क पुराच्या पाण्यात उडी मारली मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण पाण्यात वाहून गेला. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

गिरणा नदीच्या पुलावर तरूणाची स्टंटबाजी
गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी (Stunt) करताना तरूण वाहून गेल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, असे असताना देखील काही तरुणांना स्टंट (Stunt) करण्याचा मोह आवरत नाही.

तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला
गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी (Stunt) करताना एक तरुण वाहून गेला. नईम अमीन असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मालेगावचा रहिवाशी होता. या तरूणाचा सध्या शोध सुरु आहे. त्याचा अजून कुठेच पत्ता लागला नाही. या तरुणाच्या स्टंटबाजीचा (Stunt) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment