आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘उबर’ सुरु करणार फ्री राईड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । करोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह्य ट्रान्सपोर्ट उपलब्ध करण्यासाठी आता उबरने पुढाकार घेतला आहे. नॅशनल हेल्थ सर्विस प्रोवायडरने उबरसोबत करार केल्याचं सांगितलं आहे. या करारांतर्गत उबर सुरुवातीच्या टप्यात दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पटना येथील डॉक्टरांसाठी १५० गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध करून देणार आहे.

सर्व वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या उबरच्या गाड्यांमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध असणार आहेत. उदारणार्थ, ड्रायव्हर आणि प्रवाशी यांच्यामध्ये प्लास्टिकचं एक प्रोटेक्टिव बॅरियर असणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशी उतरल्यानंतर म्हणजेच, प्रत्येक राइड नंतर कारला डिसइन्फेक्ट करण्यात येणार आहे.

उबरच्या या नवीन उपक्रमाबाबत उबर इंडिया आणि दक्षिण आशियाईचे प्रेसिडेंट प्रदीप परमेश्वरन यांनी सांगितलं आहे की, ‘उबरला या करारावर गर्व आहे. यासाठी आम्ही प्रत्येक ड्रायव्हरला ट्रेनिंग दिली आहे. तसेच त्यांना सॅनिटायझर आणि मास्क सारख्या आवश्यक गोष्टी पुरवण्यात आल्या आहेत. दरम्यान, एनएचए ही एक सरकारी एजन्सी असून आयुष्मान भारत योजनेसाठी काम करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

 

Leave a Comment