भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशात भारतीय लष्करात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. लष्करातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी दिली आहे. लष्कर प्रमुख नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

”भारतीय लष्करातील ८ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यामधील दोन डॉक्टर आणि एक नर्सिंग असिस्टंट आहे. इतर चार रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. याशिवाय एक जण लडाखमधील जवान असून तो पूर्ण बरा झाला असून पुन्हा कर्तव्यासाठी हजर झाला आहे, ” अशी माहिती यावेळी लष्कर प्रमुखांनी दिली. तसेच जे जवान कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेले नाहीत त्यांनी पुन्हा युनिटमध्ये पाठवलं जात आहे. जवानांसाठी दोन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन ट्रेन बंगळुरु ते जम्मू आणि बंगळुरु ते गुवाहाटी या मार्गावर धावणार आहेत, अशी माहितीही लष्कर प्रमुखांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

सरकारकडून टाळेबंदीत शिथिलता? ‘या’ क्षेत्रांनाही मिळणार सूट, पहा यादी

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment