मागील २४ तासांमध्ये देशात ५२ हजार ५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर ८०३ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात करोनाबाधित रुग्ण संख्या वाढीचा वेग कायम आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ५२ हजार ०५०नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसाला ५० हजारांपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे.

मागील २४ तासांमध्ये देशात ८०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात ५ लाख ८६ हजार २९८ अॅक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३८ हजार ९३८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

देशात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. भारतातील करोना चाचणीने २ कोटींचा पल्ला ओलांडला आहे. २ ऑगस्टपर्यंत भारतात २ कोटी २ लाख दोन हजार ८५८ कोरोना चाचणी झाल्या आहेत. रविवारी भारतात ३ लाख ८१ हजार २७ कोरोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment