अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित विनायक बॅनर्जी , त्यांची पत्नी एस्तेर दुफलो आणि सहकारी मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. “जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टीकोन” या विषयावरील सविस्तर संशोधनासाठी या तिघांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. यावेळी तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पदके प्रदान करण्यात आली असून त्यांना बक्षीसाचे वाटप हि करण्यात आले.

दरम्यान मुंबईमध्ये जन्मलेले बॅनर्जी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे अमर्त्य सेननंतर दुसरे भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. बॅनर्जी हे देखील अमर्त्य सेन यांच्या सारखे कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.

नोबेल उद्धरणानुसार ‘तिन्ही नोबेल पुरस्कार विजेत्यांनी केलेल्या व्यापक संशोधनांमुळे जागतिक गरीबीचा सामना करण्यासाठी तसेच क्षमता सुधारण्यासाठी मदत होईल. तसेच हा दृष्टिकोन विकास अर्थकारणात बदल घडवून आणण्यास मदत करू शकेल’ असेही यात म्हटले आहे. दरम्यान इतर अर्थशास्त्रज्ञ यांचे ‘या तिघांच्या प्रयत्नामुळे विकास अर्थशास्त्राची पायाभरणी होण्यास मदत होईल आणि भविष्यात दारिद्र्य निर्मूलनामध्ये मोठे सकारात्मक बदल होतील” मत आहे.

 

Leave a Comment