अभिनेता रजनीकांतची राजकारणात एन्ट्री ; 31 डिसेंबरला करणार नव्या पक्षाची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. तर जानेवारीत नवीन पक्षाचं लॉन्चिंग केलं जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात रजनीकांत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

2021 मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही. रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.

रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या घोषणेने तामिळनाडूतील राजकारणात भूकंप घडून येण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये सध्या सत्ताधारी अण्णा द्रमुक भाजपाच्या मदतीने राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकनेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच केंद्रातील सत्ताधारी भाजपाही तामिळनाडूमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment