भारताचे तिन्ही सैन्य दल हायअलर्टवर; भारत-चीन सीमेवर सैन्य संख्या वाढवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली. चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीटरच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत . चीनला उत्तर देण्यासाठी हिंद महासागरातही नौदलाने तयारी केली आहे.

सैन्याने सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व लडाखच्या लाइन ऑफ एक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वर आपल्या सर्व प्रमुख फ्रंट-लाईन ठिकान्यांव्यतिरिक्त इतर जवानांना रवाना केले आहे. वायुसेनाने प्रथम आपल्या सर्व अग्रभागी रेषेत एलएसी आणि बॉर्डर भागावर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट स्तर वाढवला आहे.

सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान १५ आणि १६ जूनच्या मध्यरात्री झडप झाली. या झडपमध्ये भारतीय सैन्यात 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे देखील जवळपास ४० सैनिक मारले गेल्याचे बोललं जात आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगत चीनला सुनावलं.

बुधवारी रात्री पंतप्रधान निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. लडाख मधील परिस्थितीवर या दरम्यान चर्चा झाली. तर पंतप्रधान मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षांची बैठक बोलवली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल (१७ जून) या घटनेवर प्रतिक्रिया देत कडक शब्दात चीनला उत्तर दिलं आहे. आम्ही जशाच तसं उत्तर देण्यास सक्षम असून. भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. यथोचित कारवाई केली जाईल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment