करोनामुळे शाहीनबाग आंदोलकांना हटवलं; पोलिसांनी केली कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे. दिल्लीमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. संपूर्ण दिल्लीत कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग खाली करण्यात आलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेत पोलिसांनी शाहिनबाग आंदोलकांना जागा खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं होत. मात्र, आंदोलकांनी जागा खाली न केल्यानं अखेर पोलिसांनी शाहीन बाग येथील तंबू हटवला आहे. या कारवाईला विरोध करणाऱ्या काही लोकांपैकी ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

तब्बल १०१ दिवसांपासून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात शाहीनबाग येथे आंदोलक आंदोलनाला बसले होते. शाहीन बाग व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी जामिया, सीलमपूर, जाफराबाद, तुर्कमान गेट, मालवीय नगर, हौज रानी येथूनही आंदोलकांना हटवलं आहे. दिल्लीमध्ये एकूण आठ ठिकाणांवरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे.

आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, सध्या शाहीन बाग खाली करण्याची कारवाई सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही आधी विनंती करत होतो. परंतु, आज सकाळी आम्ही कारवाईला सुरुवात केली. सुरुवातीला काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत १० ते १२ लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment