देशात उष्णतेची लहर; हवामान खात्याकडून ‘या’ राज्यांना रेड अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । यंदाच्या उन्हाळ्याच्या मौसमात देशाला सध्या ऊन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये उन्हाच्या झळा बसत असून येथील तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरवात होते. त्याचप्रमाणे देशातील अन्य भागांमध्ये देखील उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उत्तर भारतात पुढील ३ दिवस तीव्र तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काही जागांवर तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे. तापमानाचा वाढता पारा पाहता हवामान खात्यानं अनेक ठिकाणी रेड अलर्ट देखील जारी केला आहे.

सोमवारी दिल्ली, पजांब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील ३ दिवस अधिक गर्मी वाढेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या राज्यातील लोकांना सावध राहण्याचा इशारा सरकारने दिला आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी मध्य तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण होवू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment