ऑगस्ट महिन्यात जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ भारतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव जगाबरोबर आता भारताच्याही चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख पार पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. विशेषकरून ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्येच भारत कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. तर शुक्रवारीही भारतात करोनाचे ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आणि तब्बल ९२६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत ६ दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला.

कोरोनामुळे सुरूवातीच्या ६ दिवसांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलमध्ये ६ हजार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे भारतात ५ हजार ०७५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे शुक्रवारी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. बिहार, तेलंगण, ओडिसा, पंजाब आणि मणिपुरमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येंची नोंद झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment