देशात कोरोनाबाधितांचा आकडा २३ लाख पार; गेल्या २४ तासांत ६० हजार ९६३ नव्या रुग्णांची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असून चिंताग्रस्त वातावरण पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ देशात ६० हजार ९६३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

एककीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाच्या कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख २९ हजार ६३९ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १६ लाख ३९ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४६ हजार ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना २८.२१ टक्के आहे. तर या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.८० टक्के असून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment