चीनमधून मालदीवच्या ७ नागरिकांची भारताने केली सुटका; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसची दहशत जगभर पसरत असताना चीनमधील वुहानमधून रविवारी सकाळी ३२३ भारतीय नागरिकांसह ७ मालदीवच्या नागरिकांना भारताने आपल्या विशेष मोहिमेद्वारे एअर इंडियाच्या विमानातून सुखरुप भारतात आणले. याबाबतची माहिती देणारे ट्विट परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केले होते. त्यांच्या ट्विटला उत्तर उत्तर देताना मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. मालदीवच्या नागरिकांना वाचवताना ‘शेजारधर्म पहिला’ असेही जयशंकर यांनी म्हटले होते.

कोरोना व्हायरसमुळे वुहान शहर आणि इतर भागात दहशतीचे सावट निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत या भागात राहणाऱ्या इतर देशातील नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. भारतातील काही नागरिकही चीनमध्ये वास्तव्यास असून त्यांच्यासह मालदीवच्या ७ नागरिकांची भारत सरकारने विशेष विमानाद्वारे सुखरुप सुटका केली आहे. भारताच्या या कृतीमुळे मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानले आहेत. ट्विटद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावर उत्तच्या र देताना मालदीवचे राष्ट्रपती आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ”मालदीवच्या ७ नागरिकांना चीनमधील वुहान शहरातून त्वरीत बाहेर काढल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. भारताची ही कृती दोन देशांमधील एक उत्कृष्ट मैत्रीचे आणि सद्भावनेचे चांगले उदाहरण आहे.”

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

गड-किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घातल्यास 6 महिन्याचा सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड

तळीरामांसाठी खुशखबर ! दारू घरपोच मिळणार, ‘या’ राज्याने केली सुरवात

कोटींच्या अपहार प्रकरणातील फरार मुख्याधिकाऱ्यास बेड्या; आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Leave a Comment