चीनसाठी धोक्याची घंटा! शक्तिशाली ‘राफेल’ फायटर जेटची पहिली स्क्वाड्रन भारतात दाखल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शत्रूला धडकी भरवणारे राफेल फायटर जेटची पहिली स्क्वाड्रन येत्या २७ जुलै रोजी भारतात दाखल होत आहे. हरियाणातील अंबाला एअर बेसवर राफेलची पहिली स्क्वाड्रन तैनात होईल. राफेलची गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन ऑगस्टमध्ये कुठल्याही लढाईसाठी सज्ज असेल. प्राथमिक माहितीनुसार, फ्रान्सच्या इस्ट्रेसवरुन ४ ते ६ राफेल विमानांची पहिली खेप भारतात दाखल होईल.

दक्षिण फ्रान्सच्या इस्ट्रेस बेसवरुन भारतीय वैमानिकच हरियाणाच्या अंबाला एअर बेसवर राफेल फायटर विमाने घेऊन येतील. फ्रान्स ते भारत प्रवासात फक्त यूएईमधील अल धाफ्रा एअर बेसवर ही विमाने काही वेळासाठी थांबतील. भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारानुसार, २०२२ पर्यंत फ्रान्स भारताला एकूण ३६ राफेल फायटर विमाने देणार आहे. या वर्षात चार ते सहा राफेल विमाने भारताला मिळतील. राफेलची पहिली तुकडी अंबाला बेसवर तर पश्चिम बंगालच्या हासिमारा बेसवर दुसरी स्क्वाड्रन असेल.

राफेल हे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. सध्या चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्वाची घडामोड आहे. राफेलचा इंडियन एअर फोर्समध्ये समावेश होणे, चीनसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण चीन-पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे कुठलेही फायटर विमान नाही आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment