लॉकडाउननंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरु होणार? रेल्वेनं दिले ‘हे’ संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आल्याने सध्या रेल्वेने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय रेल्वेने सेवा पूर्ववत करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचं या सरकारच्या आदेशाच्या रेल्वे बोर्ड प्रतिक्षेत आहे. मात्र, तत्पूर्वी रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वे बोर्डांना रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याच्या नियोजनाबाबत विचारणा केली आहे. यामध्ये १४ एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यासही सांगितले आहे. या माहितीला रेल्वे झोन्सच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी दिल्याचे इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.

रेल्वे विभागांनी तयारीत रहाण्याच्या सूचना आम्हाला रेल्वे मंत्रालयाकडून मिळाल्या आहेत. दरम्यान, जर विभागीय मंडळांकडून सुरुवातीला २५ टक्के सेवा सुरु करुन त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती ५० टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता असेल तर त्याबाबत रेल्वे मंत्रालयाला सूचित करण्याचे या विभागीय मंडळांनी निश्चित केले आहे. मात्र, हे सर्व सरकारच्या लॉकडाउनच्या धोरणावर अवलंबून आहे.

लॉकडाऊननंतर रेल्वेने आपल्या सर्व सेवा २२ मार्च २०२० च्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत. फक्त या काळात ज्या रेल्वे गाड्या त्यांच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्यांना तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी परवागनी देण्यात आली होती. दरम्यान, १५ एप्रिलपासून शंभर टक्के रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत अद्याप मंत्रालयाशी बोलणं झालं नसल्याचे विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तरी लॉकडाऊन संपल्यास १५ तारखेपासून १३,००० ट्रेन्स सुरु होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

 

Leave a Comment