देशभरात आतापर्यंत १५ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालाकडून एक दिलासा देणारी बाब समोर येत आहे. भारतात आतापर्यंत १५ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे असून ही महामारी लवकरच नियंत्रणात येईल असं ट्विट आरोग्य मंत्रालयाने केलं.

याशिवाय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती दिली. देशात १० राज्य अशी आहेत ज्याठिकाणी कोरोना संसर्गाचं प्रमाण ८० टक्के अधिक आहे. पण ही संख्या देखील लवकरच नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११ वर पोहोचली आहे. त्यापैकी ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत १५ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४३ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १५ हजार ३३२ इतकी झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ५५८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment