काश्मीरमध्ये दहशतवादी-सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु; १ दहशतवादी ठार तर १ जवान शहीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-कश्मीर (Jammu & Kashmir) मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. भारतीय जवान शहीद झाला आहे. पुलवामा जिल्ह्यातील (Pulwama) कामकाजीपोरा क्षेत्रातील सफरचंद बागेत लपल्याची मिळताचं भारतीय सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दशतवादी ठार झाला तर एकाला अजूनही सुरक्षा दलांनी घेरलं आहे.

दरम्यान, या एन्काउंटर दरम्यान भारतीय सैन्यात २ जवान जखमी झाले. या जवानांना श्रीनगरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना एक जवान शहीद झाला. दुसऱ्या जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या जवानाची प्रकृती आता स्थिर आहे

भारतीय सैन्याच्या जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-४७ रायफल, हॅण्डग्रेनेड आणि अन्य घातपाताचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दहशतवादी लपलेल्या ठिकाणानाला जवानांनी वेढा घातला असून शोधमोहीम सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment