कानपुर एनकाऊंटर : जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना भेटले मुख्यमंत्री योगी, एक करोड रुपयांची मदत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कानपुर । कानपुर एनकाउंटर मध्ये ८ पोलीस शहीद झाल्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सक्रिय झाले आहेत. आज योगीनी कानपुर मध्ये जाऊन जखमी पोलिसांची रीजेंसी हॉस्पिटल येथे भेट घेतली. नंतर त्यांनी पोलीस लाईन मध्ये जाऊन शहिद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी, असाधारण पेंशन आणि १ करोड रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

कानपुर मध्ये रात्री उशिरा शातिर बदमाशाना पकडायला गेलेल्या पोलिसांवर झालेल्या फायरिंग मध्ये ८ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. कानपूरमधील चौबेपुर ठाण्याच्या बिकरू या गावाच्या परिसरात ही घटना घडली आहे. कानपूरमधील अट्टल गुन्हेगार विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. दरम्यान त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. ज्यात ८ पोलीस शहीद तर ४ पोलीस जखमी झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी डीजीपी एचसी अवस्थी यांनी गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. या घटनेचा अहवालही त्यांनी मागविला आहे.

 

पोलिसांनी कानपूरमधील देहात मध्ये विकास दुबेच्या नातेवाईकांच्या घरी छापेमारी सुरु केली आहे. पोलिसांनी गावाला चारी बाजूनी घेरले आहे. तसेच गावात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. डीजीपी अवस्थी यांनी यामध्ये सामील लोकांच्यावर पुरावे एकत्रित करून कारवाई केली जाईल असे म्हंटले आहे. तसेच दोन अपराधी चकमकीत मारले गेले असल्याचे देखील ते म्हणाले. विकास दुबेवर कानपुर मध्ये बऱ्याच तक्रारी दाखल आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment