लॉकडाउन ४.० ची कधीही होऊ शकते घोषणा; गृहमंत्रालयाकडून जारी होईल नवी गाईडलाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपत आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालय त्याबाबत निर्देश जाहीर करणार आहे. मात्र, ही घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. चौथा लॉकडाऊन हा आत्तापर्यंत जाहीर झालेल्या तिनही लॉकडाऊनपेक्षा वेगळा असेल, याचे संकेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले होते. त्यानुसार लॉकडाउन ४.० ची घोषणा कधीही होऊ जाऊ शकते. लॉकडाउनचा पुढील टप्पा ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात बरीच सूट मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिवसभर विविध बैठका घेतल्या. लॉकडाऊन ४.० संदर्भात या बैठका झाल्या. शुक्रवारी नॉर्थ ब्लॉकमध्ये अमित शाह तब्बल पाच तास उपस्थित होते. या सर्व बैठकांना त्यांच्यासह गृहसचिव अजय भल्लाही उपस्थित होते. त्यामुळं लॉकडाउन ४.० ची घोषणा कधीही होऊ शकते. दरम्यान, चौथ्या लॉकडाऊनमध्ये संपूर्णपणे नवे नियम असतील असं पंतप्रधानांनी नुकतंच जाहीर केले होते. याआधी लॉकडाउनचा पहिला टप्पा हा २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जाहीर करण्यात आला होता. नंतर ही मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली. त्यातही वाढ करत लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे पर्यंत वाढविण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment