योगी आणि मायावतींच्या प्रचार कार्यावर निवडणूक आयोगाने घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | आपल्या वादांकित भाषणाने नेहमी चर्चेचा विषय ठरणाऱ्या मायावती आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार कार्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. भडकावू भाषण करण्याचा निकष पुढे करत निवडणूक आयोगाने हि कार्यवाही केली आहे.

मुख्यमंत्री योगी  आदित्यनाथ यांच्या भाषण आणि प्रचार कार्यावर निवडणूक आयोगाने ७२ तास बंदी घातली आहे. तर मायावतींच्या भाषण आणि  प्रचार कार्यावर ४८ तास बंदी घालण्यात आली आहे.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेला मोदींची सेना असे म्हणले होते. त्यांच्या या वक्तव्याला निवडणूक आयोगाने अक्षेपार्य मानले होते. याबद्दल त्यांना नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांच्या भाषणाला ७२ तास बंदी घातली आहे.

काय म्हणाल्या होत्या मायावती 

सहारनपूर येथे मुस्लीम मतदारांना उद्देशून मायावती म्हणाल्या होत्या कि मतांच्या विभाजनापासून सावध रहा. या विधानावर वाद निर्माण झाल्यावर आपण हे विधान मुस्लीम मतदारांना उद्देशून केले नव्हते. तर ते बहुजन समाजाला उद्देशून केले होते असे मायावती म्हणाल्या होत्या. मात्र त्यांचा हा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या पचनी पडला नाही. परिणामी निवडणूक आयोगाने मायावती यांना देखील भाषण करण्यास ४८ तास मज्जाव केला आहे. सदरची  बंदी हि १६ एप्रिल पासून सुरु होणार आहे.

Leave a Comment