CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे.

सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील आसू या विद्यार्थी संघटनेने 29 डिसेंबर रोजीच पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या उदघाटनाला आल्यास जोरदार निदर्शने, आंदोलन करण्यात येतील असा इशारा देण्यात आला होता.

आंदोलन कर्ते आसामचे मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या विरोधात देखील आंदोलन करत आहेत. प्रसिद्ध गायक झुबिन म्हणाला की, आम्ही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची वाट पाहत आहोत. जेणेकरुन आम्हाला ते आल्यास CAA ला विरोध करण्याची संधी भेटेल.

Leave a Comment