केंद्र सरकार ‘इस्रो’चं खासगीकरण करणार असल्याच्या चर्चेवर अध्यक्ष के. सिवन म्हणाले..

नवी दिल्ली । भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे अध्यक्ष के सिवन यांनी संस्थेच्या खासगीकरणाच्या चर्चेवर स्पष्टीकरण देत दावे फेटाळून लावलेत. ‘इस्रो’चं खासगीकरण होणार नाही, असा दावा के सिवन यांनी केला आहे. इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘अनलॉकिंग इंडियाज पोटेन्शिअल इन स्पेस सेक्टर’ (Unlocking India’s Potential in Space Sector) या वेबिनार ते बोलत होते.

यावेळी सरकार इस्रोचं खासगीकरण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत परंतु, हा केवळ भ्रम असून असं कधीही होणार नाही, असं के सिवन यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, लवकरच ‘स्पेस अ‍ॅक्टिव्हिटी बिल’ संसदेत मांडलं जाईल, असंही के सिवन यांनी म्हटलंय. याद्वारे खासगी क्षेत्राला इस्रोसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. इस्रो खासगी कंपन्यांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करणार आहे, त्यामुळे तंत्रज्ञान विकास आणि क्षमता विस्तार होऊ शकेल, असंही के सिवन यांनी म्हटलंय. नव्या अंतराळ नीतीसहीत खासगी कंपन्या ‘इस्रो’सोबत अंतराळ मोहिमांत भाग घेईल. परंतु मुख्य काम इस्रो आणि त्याचे वैज्ञानिकच करतील. अंतराळ क्षेत्रात बदलांकरता आणण्यात आलेली नव्या नीती इस्रो आणि देशासाठीही ‘गेम चेंजर’ ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

नव्या नीतीमुळे भारत अंतराळ क्षेत्रात आपली नवी ओळख तयार करेल. सध्या इस्रो संशोधन आणि विकासाद्वारे रॉकेट आणि सॅटेलाईट बनवण्यात सक्षम आहे. सरकारनं अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्याच्या केलेल्या घोषनेनंतर खासगी कंपन्याही ही साधनं बनवण्यात मदत करेल. त्यामुळे जास्तीत जास्त सॅटेलाईट अवकाशात सोडता येतील, असंही के सिवन यांनी म्हटलं. ‘अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठ्या संख्येत संचार उपग्रहांची गरज असेल. यासाठी खासगी कंपन्या पुढे येऊन इस्रोसोबत काम करू शकतील. पण, याचा अर्थ इस्रोचं खासगीकरण होणार असं नाही’ असंही के सिवन यांनी खासगी कंपन्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com