सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत.

कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू

सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षाखालील किंवा साठ वर्षावरील असतात. एकूण मृतांचे सरासरी वय हे सत्तर वर्षांपेक्षा थोडे जास्तच असते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर साडेसात अब्ज लोकसंख्येत २ लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती?

सार्वजिनक वाहतूक सुरु करणार पण… – नितीन गडकरी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळं केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून या काळात संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, भविष्यकाळात अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचं मत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी … Read more

अरे जरा आवर घाला..! लॉकडाऊनमध्ये देशात ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दिड महिन्यापासून घरात कोंडून असलेल्या जनतेला बाहेर फिरता येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं लॉकडाउनच्या या काळात घरात आणखी काही दिवस मोबाईल किंवा इतर काही गोष्टी करण्यात नागरिकांना वेळ घालवावा लागणार आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या … Read more

महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक आयोजित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्रात १५,५२५ … Read more

मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय; सोनिया गांधी यांचा प्रश्न

नवी दिल्ली । १७ मे रोजी लॉकडाउन ३ ची मुदत संपणार आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. After May 17th, what? … Read more

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

नवी दिल्ली । देशात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाचां सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलं … Read more

कहर कोरोनाचा; देशभरात २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू; 2 हजार 958 नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाबाधितांची आकडा 50 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशाभरात 1 हजार 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 183 लोक … Read more

भारतीय सैन्याचे मोठे यश !१२ लाखांचे इनाम असलेल्या ‘मोस्ट वॉण्डेट’ दहशतवाद्याला घातले कंठस्नान

नवी दिल्ली | अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमुळे सुरु असणाऱ्या चकमकीमध्ये भारताने 12 लाखांचे इनाम असणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळं भारतीय सैन्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू या चकमकीमध्ये ठार झाला आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. दरम्यान भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणाऱ्याला … Read more

केंद्रानं केली पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ, पण..

नवी दिल्ली । कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारनं सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला असून, यामुळे अर्थ व्यवहाराचं चक्र जवळपास ठप्प झालं आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसूलाचा ओघ अटल्यासारखीचं स्थिती आहे. यातून मार्ग काढण्यास केंद्रानं सुरूवात केली असून, आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या … Read more