कोरोनाची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगावरील सर्वात मोठं संकट – नरेंद्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  जी-20 शिखर संमेनलाना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हा साथीचा रोग मानवी इतिहासातला मोठा टर्निंग पॉईंट आहे. हे जग दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे.

या बैठकीनंतर पंतप्रधानांनी ट्वीट केलं आहे की, जी-20 नेत्यांशी खूप महत्त्वाची चर्चा झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निश्चितच आपण या महामारीमधून सावरू. या व्हर्च्युअल संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल सौदी अरबचे आभार.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-20 शिखर संमेलनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सौदी अरबचे शाह सलमान यांनी शनिवारी जी-20 शिखर संमेलनाची सुरुवात केली आणि कोरोनाशी लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करुया, असे आवाहनही केले.

जगभरात आतापर्यंत 5 कोटी 84 लाख 75 हजार कोरोनाबधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 13 लाख 85 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत 1 कोटी 24 लाख 46 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर भारतात ही संख्या 90.9 लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात आतापर्यंत 1 लाख 33 हजार 263 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment