मागील २४ तासात देशात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण; ९७७ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर कायम असून मागील २४ तासांत जवळपास ७० हजार नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याचे दिसत आहे. मागील २ आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा स्थिरावताना दिसत होता. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० हजारापर्यंत मर्यादित होता. मात्र, मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे विक्रमी ६९६५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८ लाख ३६ हजार ९२६ वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये ६ लाख ८६ हजार ३९५ एक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत देशातील २० लाख ९६ हजार ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, ५३ हजार ८६६ जणांना कोरोनामुळे जीव गमवावे लागले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १३,१६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३४६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,२८,६४२ एवढी झाली आहे. तर राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment