मागील २४ तासांत १ हजारांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू; ६४,५३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा कहर अजून कायम असून गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज ५० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशात ६४ हजार ५३१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १ हजार ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून२७ लाख ६७ हजार २७४ इतकी झाली आहे. तर देशात सध्या ६ लाख ७६ हजार २७४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. दरम्यान, आतापर्यंत २० लाख ३७ हजार ८७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशातील एकूण मृतांची संख्याही ५२ हजार ८८९ वर पोहोचली असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली.

याचबरोबर देशात चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. १८ ऑगस्ट रोजी देशात ८ लाख १ हजार ५१८ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली. देशात १८ ऑगस्टपर्यंत एकूण ३ कोटी १७ लाख ४२ हजार ७८२ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरनं दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment