Sunday, April 2, 2023

मोदींनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा उल्लेख केला, ज्यांना ठोठावण्यात आला 13000 रुपयांचा दंड ते जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या दिलेल्या संदेशामध्ये म्हटले की, आपण भलेही दोन हात लांब राहण्यापासून ते वीस सेकंदापर्यंत हात धुन्यापर्यंत सावधगिरी बाळगली असेल. मात्र आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती बेजबाबदारी हे एक मोठे चिंतेचे कारण आहे. यावेळी त्यांनी मास्क न वापरल्यामुळे बल्गेरियाचे पंतप्रधान बोइको बोरिसोव्ह यांना लावलेल्या 13,000 रुपयांच्या दंडाचे उदाहरण दिले.

पीएम मोदी म्हणाले, “हल्लीच आपण एका बातमीमध्ये पाहिले असेलच की एका देशाच्या पंतप्रधानांना 13 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे कारण ते मास्क न घालताच बाहेर पडले होते. भारतातही स्थानिक प्रशासनाने याच शिस्तीने काम केले पाहिजे. 130 कोटी भारतीयांना संरक्षण देण्याची ही मोहीम आहे. कोणीही गाव प्रमुख किंवा देशाचा पंतप्रधान नाही, नियमांपेक्षा कोणीही वरचढ नाही. ”खरं तर मोदींनी आपल्या भाषणात बल्गेरियाच्या पंतप्रधानांचे उदाहरण दिले. बोरिसोव्हला याना नुकताच दंड भरावा लागला कारण ते मास्क शिवाय चर्चमध्ये गेले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांनी पुढे आपल्या संबोधनादरम्यान सांगितले की, “आता संपूर्ण भारतात ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ ही रेशन कार्डचीसाठीची व्यवस्था केली जात आहे. याचा सर्वात जास्त फायदा त्या गरीब सहकाऱ्यांना होईल , जे आपले गाव सोडून नोकरीसाठी किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी इतर ठिकाणी जातात. “

त्याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्ताराची घोषणाहि पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. ते म्हणाले की, सध्या अनेक उत्सव येणार आहेत. त्यामुळे या उत्सवांच्या वेळी गरजा वाढतात आणि खर्चही वाढतो. या सर्व बाबी लक्षात घेता आता असे ठरविण्यात आले आहे की, आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत वाढविण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.